Bank Customer Service Center Complaint Form | ग्रामीण बातम्या |बँक ग्राहक सेवा केंद्र तक्रारी अर्ज असे लिहा.

बँक ग्राहक सेवा केंद्र
बँक ग्राहक सेवा केंद्र 

तक्रारी अर्ज लिहा.

बँक ग्राहक सेवा केंद्र चालकाने जादा पैसे घेतल्या संबंधित आणि कायमस्वरूपी id बंद करण्याबाबत. 

महोदय.

मी (आपले नाव लिहा ) ( मोबाईल नं लिहा ) आपणास विनंती पूर्वक ऑनलाईन पोर्टल द्वारे तक्रारी अर्ज करितो कि,( दुकान दाराचे नाव आणि पत्ता लिहा )  बँक ग्राहक सेवा केंद्र वर गेलो असता मला माझा बँक अकाउंट मध्ये मला ( किती पैसे टाकायचे आहे ) पैसे ट्रान्सफर करायचे होते. परंतु एक हजार वर जास्त चार्ज लागेल असे बँक ग्राहक सेवा केंद्र चालकाने सांगितल्याने मी नंतर 1500 रुपये ट्रान्सफर केले, तरी त्याने माझा खात्यात 1499 रुपये इतके ट्रान्सफर केले आणि 1499 रुपये वर त्याने 150 रु. चार्ज घेतले. मी ( बँक ग्राहक सेवा केंद्र चालकाला  सांगितले कि इतके चार्ज कश्याला, तुम्हाला बँक सर्व्हिस ने पैसे मिळतात तरी इतके कशाला सांगितल्याने त्याने आडमुठ पणा करत, मी जास्त घेईल किंवा कमी पैसे घेईल तू कोण सांगणारा असे सांगत तू कुठे राहतोस ( शिवीगाळ केल्यास पोलीस तक्रार करावी ) मारण्याची धमकी दिल्यास ( पोलीस गुन्हा नोंद करावा ). 

माननीय महोदय  मी आपणास विनंती पूर्वक तक्रारी अर्ज करितो कि ( त्या दुकान दाराचे नाव पत्ता लिहा ) याने माझा कडून जास्त पैसे घेतल्याने आणि धमकी देत शिवीगाळ केल्याने याची बँक सर्व्हिस id कायम स्वरूपी बंद करण्यात यावी.

(पुरावा म्हणून )सोबत पैसे ट्रान्सफर केलेली प्रत जोडत आहे.

केलेल्या कार्यवाही ची पत्र मिळावे.

तक्रार कुठे करावी.

वरील तक्रार ही ऑनलाईन आपले सरकार पोर्टल तक्रारी वर करण्यासाठी आहे, तुम्ही जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, आणि मंत्रालयात तक्रार करू शकता.

तक्रार ऑनलाईन करा.

ऑनलाईन तक्रारी साठी लिंक आहे क्लिक करा. Link 

तक्रार ऑफलाईन ही करू शकता!

वरील अर्ज आपण हाताने लिहून अथवा कॉम्प्युटर लॅपटॉप वरून प्रिंट करून speed पोस्ट ऑफिस ने जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या पत्यावर पाठवू शकता.

Post a Comment

0 Comments