महाराष्ट्र शासन कृषी विभाग. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धुळे. केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME) |Prime Minister Formalization of Micro Food Processing Enterprises
![]() |
| Prime Minister Formalization of Micro Food Processing Enterprises |
खालीलपैकी कोणताही उद्योग करा आणि वैयक्तिक सबसिडी 10 लाख व गटामार्फत सबसिडी 3 कोटीपर्यंत मिळवा.
स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणेसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जाहीर केली आहे या योजने अंतर्गत स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू/विस्तार करण्यासाठी ३५% किंवा १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.*
योजनेचे नाव : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)
पात्र लाभार्थी :
शेतकरी, युवक, उद्योजक, शेतकरी कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला बचतगट, विविध कार्यकारी संस्था
योजने अंतर्गत समाविष्ट प्रक्रिया उद्योग.
१. *दूध प्रक्रिया* : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी इ.
२. *मसाले प्रक्रिया* : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला.
३. *चटणी प्रक्रिया* :शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी.
४. *तेलघाणा प्रक्रिया* : शेंगदाणा, सोयाबीन, सुर्यफुल, तीळ, बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.
५. *पावडर उत्पादन प्रक्रिया*:काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, जवारी मिर्ची, धना, जिरा, गुळ, हळद इ. Link
६. *पशुखाद्य निर्मिती*: मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इ.
७. *कडधान्य प्रक्रिया* : हरभरा व इतर डाळी(पॉलिश करणे), बेसन तयार करणे इ.
८. *राईस मिल*: चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इ.
९. *बेकरी उत्पादन प्रक्रिया* : Link
बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे इ.
![]() |
| वरीलपैकी कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी यांच्याशी संपर्क साधावा.. |
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनासाठी (PM FME) ऑफिस पत्ता- तालुका कृषी अधिकारी कार्यालय Link


0 Comments