घरात चोरी झाल्यास पोलीस स्टेशन तक्रार अर्ज कसा लिहावा | Police complaint Format

घरात चोरी झाल्यास पोलीस स्टेशन तक्रार अर्ज कसा लिहावा | Police complaint Format
घरात चोरी झाल्यास पोलीस स्टेशन तक्रार अर्ज कसा लिहावा | Police complaint Format 


घरात चोरी झाल्यास पोलीस स्टेशन तक्रार अर्ज कसा लिहावा | तक्रार अर्ज नमुना मराठी pdf | तक्रार अर्ज नमुना विनंती अर्ज कसा लिहावा नमुना अर्ज वाचा आणि आपल्या पद्धतीने शेअर करा.

घरात चोरी झाल्यास पोलिस तक्रारीचा नमुना. : तुमच्या घरात चोरी झाल्यास तुम्ही कायदेशीर अडचणीत येऊ नये, म्हणून मी पोलीस तक्रारीचा नमुना तयार करून देत आहे.हे केवळ तुमच्या काळजीपोटी देत आहे राजकारणाचा आणि याचा काहीही संबंध नाही याची नोंद घ्यावी.

प्रति,
मा. सो. पोलीस निरीक्षक,- पोलीस अधीक्षक
 / पोलीस आयुक्त यांच्या सेवेशी.
(ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रातील ) नाव लिहा तालुका / जिल्हा.
दिनांक.


अर्जदार = आपले नाव लिहा.
( पत्ता लिहा पूर्ण - मोबाईल नं लिहा )

विषय : माझ्या घरातील काही वस्तू माझ्या परवानगीशिवाय कोणीतरी नेल्याबद्दल.

महोदय,
मी गावाला गेलो होतो.घराला कुलूप होते. मी दिनांक ( ... ) सकाळी ( ..) वाजता घरी आल्यावर बघितले तर घराचे कुलूप तोडून दार उघडे होते. किल्ली माझ्याकडे असल्याने नाईलाजाने संबंधित व्यक्तीने दार अशा रीतीने उघडले असावे हे ही मी समजू शकतो. पण त्यानंतर घरात बघितले तर कपाटातील रोख ( ...) रुपये, ( .... ) तोळे सोने,( ....) वस्तू आढळल्या नाहीत. त्यामुळे कुलूप उघडणारी व्यक्ती व त्या वस्तू नेणारी व्यक्ती एकच असावी असा माझा भाबडा तर्क आहे.या तर्काची आपल्याला अगदी सहज शक्य असेल शहानिशा करावी.

अर्थात मी त्या व्यक्तीवर चोरीचा आरोप करणार नाही कारण जोपर्यंत ती व्यक्ती या मौल्यवान वस्तू का नेल्या ? हे आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्याला चोरी म्हणणे बेकायदेशीर व संबंधित व्यक्तीची बदनामी आहे.त्यामुळे त्याच्या मानवी हककाची पायमल्ली मी करणार नाही. फक्त त्याने या वस्तू का नेल्या व केव्हा परत करणार याबाबत आपण विचारणा करावी ही विनंती.

हेही वाचा :  Police complaint Format In Marathi Link.
पोलिसांनी अटक केली तर घाबरू नका! हा कायदा वाचा. Link 

मी व्यक्ती म्हणताना ती व्यक्ती पुरुष आहे की स्त्री याबाबत काहीही म्हणत नाहीये याची नोंद घ्यावी कारण तसा अर्थ ध्वनित झाल्यास जगातील पुरुष इंवा महिला या समूहाच्या काही कोटी व्यक्तींची बदनामी होऊ शकते. ही व्यक्ती भारतीय असेल असाही माझा संशय नाही कारण त्यातून कोट्यवधी भारतीय बांधव व भगिनी यांची बदनामी होऊ शकते याची मला नम्र जाणीव आहे. इतर देशातील असेल असेही मी म्हणत नाही कारण त्या देशांची बदनामी होऊ शकते व त्यातून परराष्ट्रीय तणाव निर्माण होऊन देश आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीत येऊ शकतो..याचे गांभीर्य मला माहित आहे.

मी संशयित म्हणून कोणाचेही नाव घेत नाही कारण त्यातून त्यातून त्या व्यक्तीचे आडनाव,जात,धर्म,गाव,व्यवसाय यांच्याविषयी बदनामी होऊ शकते याची मला नम्र जाणीव आहे..

हे सर्व विचारात घेवून आपण या घटनेचा शोध घ्यावा ही विनंती
हा माझा पहिला व शेवटचाच अर्ज आहे. यानंतर मी पाठपुरावा करणार नाही कारण मी सतत आलो तर शासकीय कामात अडथळा हा गुन्हा आपण माझ्यावर दाखल करू शकता किंवा चोरी गेलेल्या वस्तू मी कोठून आणल्या याची चौकशी लाऊ शकता याची भीती मनात आहेच.
आपला नम्र.

निष्कर्ष 
मित्रांनो  मला असे व्हाटते कि सदर लेख आपणास आवडला असेल आणि ह्यात आपल्या पद्धतीने  काही  शब्द बदलू शकता घरात चोरी झाल्यास पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज आम्ही दिलेला लेख नक्कीच आवडला असेल, अशाच काही जनहितार्थ नमुना लेखन. तक्रारी अर्ज नमुना आम्ही सादर करीत असतो . आमच्या Page ला Follow करण्यासाठी Contact page मध्ये जाऊन जॉईन व्हा .

Post a Comment

Previous Post Next Post