रेशीम शेती तुतीची लागवड साठी मिळेल चार लाख अनुदान. / Tuti Lagawad Yojana

रेशीम शेती : तुतीची लागवड करा अन् चार लाखांचे अनुदान मिळवा. रोहयोंतर्गत मिळणार अनुदान; विशेष अभियानातून जनजागृती. तुतीची लागवड चार लाख अनुदान देणारी योजने बद्दल माहिती जाणून घ्या. आणि आजच online फोर्म भरून घ्या. Tuti Lagawad Yojana In Marathi

रेशीम शेती तुतीची लागवड साठी मिळेल चार लाख अनुदान.
रेशीम शेती तुतीची लागवड अनुदान योजना 

तुतीची लागवड योजना संबंधित माहिती
  • कोणाबाद्द्ल लेख आहे .        तुतीची लागवड योजना
  • कोणी लांच केले ? .               महाराष्ट्र सरकारने
  • लाभार्थी .                             महाराष्ट्र राज्याचे शेतकरी
  • साल                                     2023
  • उद्देश्य                                 तुतीची लागवड योजनाची महत्वपूर्ण माहिती देणे.
  • अधिकृत वेबसाइट               लिंक

रेशीम शेती व उद्योग : वाढीसाठी जिल्ह्यात महारेशीम नोंदणी अभियानाची सुरुवात झाली असून, यंदा रेशीम शेती पाच हजार एकरापर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

 रोहयोंतर्गत  रेशीम उद्योग विकास योजना

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी जवळपास दोन लाख १८ हजार रुपये तर संगोपन गृह बांधकामासाठी एक लाख ७९ हजार रुपये असे तीन वर्षांसाठी जवळपास तीन लाख ९७ हजार ३३५ रुपये अनुदान मिळणार आहे.

तुतीची लागवड साठी नोंदणी 

तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी केली जात असून त्यांना अनुदानाविषयी माहिती दिली जात आहे. हे अभियान २० डिसेंबरपर्यंत राबविले जाणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड, कीटक संगोपनगृह बांधकामासाठी असे तीन वर्षांसाठी तीन लाख ९७ हजार ३३५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. 

तुतीची लागवड साठी अनुदान

● या योजनेतून ३ वर्षांसाठी ३ लक्ष ९७ हजार ३३५ रुपये मजुरी व साहित्यासाठी दिले जातात. अल्पभूधारक नसलेल्या मात्र रेशीम विकास योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांना सिल्क समग्र-२ या योजनेत सहभागी होता येईल.

२० डिसेंबरपर्यंत मुदत अभियान

महारेशीम अभियानदरम्यान रेशीम उद्योग योजना राबविण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी २० डिसेंबरची मुदत असणार आहे. या कालावधीत संबंधितांना रेशीम उद्योगासाठी नोंदणी करता येईल.

काय आहे महारेशीम अभियान?

  • महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ नुसार
  • रेशीम शेती व त्या आधारित पूरक उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 
  • त्यानुसार शासन निर्णय १० नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
  • या महारेशीम अभियान २०२४ अंतर्गत रेशीम रथ तयार करून गावोगावी रेशीम शेतीबद्दल प्रचार- प्रसिद्धी केली जात आहे.

तुतीची लागवड साठी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे.
  • १) आधार कार्ड .
  • २) मतदान कार्ड .
  • ३) रहिवासी दाखला.
  • ४) राशन कार्ड .
  • ५) उत्नाचा दाखला.
  • ६) पसपोर्ट फोटो.
  • ७) शाळा सोडल्याचा दाखला.
  • ८) लाभ न घेतल्याचा स्वयंघोषणा पत्र.
  • ९) जॉब कार्ड.
  • १०) अनुसूचित जाती / जमाती असल्यास ( जातीचा दाखला )

कशासाठी किती अनुदान?

या योजनेतून तुती लागवड 1) एक एकरासाठी ४५ हजार रुपये, 2) ठिबक सिंचनासाठी ४५ हजार रुपये प्रति एकर, 3)  संगोपन गृहासाठी (६० बाय २५ फूट) २ लक्ष ४३ हजार, 4)  संगोपन साहित्यासाठी ३७ हजार ५०० रुपये, 5 )निर्जंतुकीकरण साहित्यासाठी ३ हजार ७५० रुपये दिले जातात.

नोंदणीसाठी निकष

अल्पभूधारक शेतकरी असावा, जॉबकार्डधारक, तसेच सिंचनाची सोय असावी. एका गावात पाच लाभार्थी मिळावेत. ग्रामपंचायत ठराव, कृती आराखड्यात समावेश असणे आवश्यक आहे. सातबारा, आठ अ, चतुःसीमा नकाशा, आधार कार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स, पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे आदी कागदपत्रांसह अर्ज करावा लागणार आहे. ( Tuti Lagawad Yojana In Marathi )

Post a Comment

Previous Post Next Post