![]() |
| ग्रामपंचायतचे सर्व दाखले MAHA e Gram Citizen Portal Apps वर |
ग्रामीण बातम्या : ग्रामपंचायतीमार्फत दिली जाणारी सर्व शासकीय प्रमाणपत्रे मोबाइलवरून घरबसल्या काढता येत आहेत. यासाठी महा ई-ग्राम सिटिझन Apps विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यात Apps वरून दाखले काढण्यासाठीच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात ७९ हजार ९० लोकांनी विविध दाखले घरबसल्या काढले आहेत.
MAHA e Gram Citizen Portal Apps उपलब्ध
Apps च्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील २८ हजार ग्रामस्थांनी कागदपत्रे मिळविली आहेत. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचा एक मोबाइल Application Apps उपलब्ध करून दिले आहे. हा Apps आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून गावातील नागरिक घरबसल्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले काढू शकतात. ही सुविधा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध झाली आहे. यातून हजारो नागरिकांनी वर्षभरात विविध कागदपत्रे मिळविली आहेत. ग्रामपंचायतीला या माध्यमातून नागरिकांकडून मिळणारा गृहकर वसूल करणे सोयीचे झाले असल्याने ग्रामपंचायतीला गृहकर वसुलीत येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.
हेही वाचः संबंधित माहिती : Free Grampanchayat Dakhale list, PDF सह पहा संपूर्ण यादी!
हेही वाचः संबंधित माहिती : Free Grampanchayat Dakhale list, PDF सह पहा संपूर्ण यादी!
काय आहे महा ई-ग्राम सिटिझन Apps
ग्रामस्थांना जास्तीत जास्त सुविधा घरबसल्या कशा देता येतील याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायतराज विभागामार्फत महा-ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचे एक मोबाइल Application Apps कार्यान्वित केले आहे. हे Apps आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून घरबसल्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले मिळवू शकणार आहेत.Apps कसे इन्स्टॉल कराल?
हे Application हवे असेल तर आम्ही तुम्हला लिंक प्राप्त करून देऊ किंवा आपण आपल्या मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट हे Apps इन्स्टॉल करून. Apps ओपन करून रजिस्टर करू शकता. Registration करण्यासठी खालील प्रमाणे स्टेप दिलेले आहे.Maha e Gram Citizen Portal Registration कसे करावे ?
- सर्वप्रथम मोबाईल वर Download केलेला Maha e Gram Citizen Apps चालू करावा.
- नंतर मोबाईल नंबर टाका.
- नंतर टाकलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येणार.
- OTP टाकून Registration नावावर क्लिक करा.
- नंतर Maha e Gram Citizen Portal Registration Success असा SMS येईल.
Maha e Gram Citizen Portal Registration User आणि ID कसा मिळेल.
- सर्व प्रथम Maha e Gram Citizen Portal Registration केलेला SMS नंतर
- पुन्हा Maha e Gram Citizen Apps चालू करावा.
- यामध्ये आपले नाव.
- लिंग, Selected करा.
- जन्मतारीख, टाका.
- मोबाइल नंबर, टाका.
- ई-मेल आयडी ही सर्व माहिती जतन करा.
- त्यानंतर मिळालेल्या युजर पासवर्ड द्वारे लॉगिन करा.
महा ई-ग्राम सिटिझन Apps
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचा एक मोबाइल Application Apps उपलब्ध करून दिला आहे. या Application Apps नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीकडून मिळणारी प्रमाणपत्रे मिळत आहेत. शिवाय घरबसल्या ग्रामपंचायत कराचा भरणादेखील करता येत आहे. - इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूरकोणते दाखले मिळणार?
नागरिकांना घरबसल्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र, पीएम विश्वकर्मा, ई-श्रमकार्ड, महात्मा फुले योजना, आयुष्मान भारत ग्रामपंचायत स्तरावरून मिळणारे विविध दाखले, योजनांचा लाभासाठी कागदपत्रे या Application Apps वरून मिळत आहेत.
Conclusion
मित्रांनो तुम्हाला दिलेले माहिती म्हणजे MAHA e Gram Citizen Portal Apps काय आहे, कसे इंस्टाल करावे , आणि Registration कसे करावे अशी माहिती तुम्ह्लाळा दिली आहे, हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.

0 Comments