ग्रामपंचायतसाठी तक्रारी अर्ज कसा लिहावा? / ग्रामपंचायत तक्रार अर्ज PDF

ग्रामपंचायतसाठी तक्रारी अर्ज कसा लिहावा? / ग्रामपंचायत तक्रार अर्ज PDF
ग्रामपंचायतसाठी तक्रारी अर्ज कसा लिहावा? / ग्रामपंचायत तक्रार अर्ज PDF

ग्रामपंचायतसाठी तक्रारी अर्ज कसा लिहावा ? : मित्रांनो,आपल्या गावातील ग्रामसभेमध्ये शासकीय कर्मचारी उपस्थित राहत नसतील तर त्या अनुषंगाने आपण आपल्या पंचायत मध्ये खालील प्रमाणे तक्रार करावी.

प्रति,

दिनांक :- / /२०

मा. सरपंच /. ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी 

यांच्या सेवेशी 

विषय :- ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीन नुसार गावात काम करणाऱ्या प्रत्येक शासकीय / निमशासकीय कर्मचारी / अधिकारी / शासन अंतर्गत काम करणाऱ्या संस्था या सर्वांना ग्राम सभेस हजर राहण्यासाठी कळविणे बाबत.. 

महोदय,

उपरोक्त विषयानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम ७ नुसार ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे त्यामध्ये ग्रामपंचायत कार्याशेत्रात काम करणारे सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी / अधिकारी / शासन अंतर्गत काम करणाऱ्या संस्था या सर्वांना ग्राम सभेस हजर राहणे बंधनकारक आहे. परंतु आपल्या ग्रामपंचायत मध्ये संबंधित व्यक्ती ग्रामसभेस हजर राहत नाहीत.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ७ पोटकलम (६) नुसार गावामध्ये काम करीत असलेल्या शासकीय, निमशासकीय व पंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर तसेच त्यांच्या कार्यालयातील रोजच्या उपस्थितीवर ग्रामसभेचे शिस्त विषयक नियंत्रण असेल. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ७ पोटकलम (१०) नुसार

ग्रामसभेने सुट दिलेली नसेल तर गावात काम करणारे शासकीय, निमशासकीय व पंचायातीमधील सर्व कर्मचारी ग्रामसभेत हजर राहतील. तरी देखील वारंवार कोणते अधिकारी व कर्मचारी विना परवानगी घेता ग्रामसभेस गैरहजर राहत असतील तर त्यांच्यावर कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : ग्रामपंचायत विनंती अर्ज कसा लिहावा नमुना

वर नमूद केल्याप्रमाणे कृषी विभाग, जिल्हा परिषद शिक्षक वर्ग, अशा सेविका त्यांच्या वरिष्ठ सहकारी ज्यांना गावात फिरून कामे करावी लागतात असे, तलाठी .अंगणवाडी सेविका, गावात काम करणारे महिला आर्थिक विकास महामंडळ कर्मचारी प्रतिनिधी, उमेद अभियान बचत गट प्रतिनिधी इत्यार्दी सर्वांना ग्रामसभेस उपस्थितराहण्याबाबत योग्य ती कारवाई करावी वरील प्रमाणे कोणी संबंधित उपस्थित नसेल व लेखी सकारण नसताना रजा घेतली असेल तर त्यावर प्रथम दर्शनी कारवाई करावी विनंती सदर पत्राचे महिला सभेत व ग्रामसभेत वाचन करावे यावर चर्चा होऊन पुढील कारवाईसाठी ठराव करवा हि नम्र विनंती.

ग्रामस्थाची सही,

नाव:

ग्रामपंचायतसाठी Online  तक्रारी अर्ज कसा लिहावा? 

लिंक 

ग्रामपंचायत तक्रार अर्ज | PDF नमुना

मित्रांनो, आपल्या गावातील ग्रामसभेमध्ये कोणतेही तक्रारी करायची असेल तर आम्ही दिलेला PDF Download करा. आणि आपल्या  शासकीय कर्मचारी उपस्थित राहत नसतील तर त्या अनुषंगाने आपण आपल्या पंचायत मध्ये तक्रार करावी.

ग्रामपंचायत तक्रार अर्ज | PDF Link 

Post a Comment

Previous Post Next Post