ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार कोणते? : मित्रांनो ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार अजून देखील कोणाला माहिती नाही, चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
![]() |
| ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार कोणते? संपूर्ण माहिती जाणून घ्या ? |
ग्रामपंचायतीची निवडणुक झाल्यावर निवडून आलेल्या सदस्यांपैकी एका सदस्याला सरपंच पदावर व दुसऱ्याला उपसरपंच पदावर निवडून देण्यासाठी आपली मतं देणे हा प्राथमिक अधिकार ग्रामपंचायत सदस्याला असतो. याशिवाय, ग्रामपंचायत सदस्य अधिकार व कर्तव्य पुढीलप्रमाणे आहेत:
- ग्रामपंचायतीकडून मासिक सभेची नोटीस, सभेपुर्वी किमान तीन दिवस अगोदर सदस्यांना प्राप्त करण्याचा अधिकार असतो.
- सभेची नोटीस मिळाल्यावर त्यातील विषयांचा अभ्यास करून त्यावर विधायक चर्चा घडवुन आणण्यास सहभागी होणे.
- जर मासिक सभा/बैठक सुरू होण्याच्या वेळेत आवश्यक गणपूर्ती (सरपंच/उपसरपंच समाविष्ट करून १/३ एवढी) पूर्ण झाली नसेल तर, पुढील ३० मिनिटांसाठी गणपूर्तीसाठी प्रतिक्षा केली जाते. त्या अवधीमध्ये गणपूर्ती पूर्ण नाही झाली तर अशी सभा तहकूब केली जाते व पुढील इतर नियोजित दिवशी घेतली जाते.
- विशेष मासिक सभेसाठी, ग्रामपंचायत सदस्य संख्येच्या निम्म्या किंवा त्याहून जास्त सदस्यांनी लेखी मागणी केल्यास, अशी मागणी केल्यापासून आठ दिवसांच्या आता सारपंचास विशेष सभा बोलवणे आवश्यक असते.
- सभेतील चर्चेमध्ये आवर्जून सहभाग घेऊन संबंधित विषयावर/ठरावांवर आपली मत मांडणी करण्याचा अधिकार ग्रामपंचायत सदस्यला असतो.
- सभेतील ठरावाच्या मंजुरीसाठी मत देणे कींवा मतावर तटस्थ राहणे.
- आवश्यक असल्यास ग्रामपंचायतीची कागदपत्रे पाहण्यासाठी/तपासणी करण्यासाठी मागणी करणे.
- ग्रामपंचायत मालमत्ता व निधी यांच्या गैरवापरास प्रतिबंध करणे, चुकीच्या कारभाराला विरोध करणे.
- ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या, पंचायतीच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या आणि पंचायतीच्या ठरावांची अंमलबजावणी पूर्णपणे न करणाऱ्या, पदाधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हा परिषद अध्यक्षाकडे किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार/अर्ज करणे.
- ग्रामपंचायतीचे कार्य करण्याची इच्छा राहिली नाही तर आपल्या सदस्यपदाचा राजीनामा देणे.
- सरपंचाने/उपसरपंचाने आपली कर्तव्ये व जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही तर त्याच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव पंचायतीत मंजूर करून घेऊन त्याला पदावरून काढून टाकणे.
ग्रामपंचायत सदस्यांची कर्तव्य/कार्य/कामे:
ग्रामपंचायत सदस्यांची कर्तव्य/कार्य/कामे सामान्यतः पुढीलप्रमाणे:
- ग्रामपंचायतीने वेळोवेळो सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे.
- ग्रामपंचायतीने बोलावलेल्या प्रत्येक मासिक सभा व ग्रामसभेत उपस्थित राहणे व सभेच्या कामकाजात भाग घेणे.
- सभेपुढे मांडावयाचे विषयाबाबत सरपंचांना पाच दिवस अगोदर लेखी पत्र देणे.
- सभा सुरू होण्यापूर्वी सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे व ती पूर्ण होईपर्यंत राहिली पाहिजे.
- आपल्या वॉर्ड मधील नागरिकांना ग्रामसभा बैठकीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे.
- फक्त आपल्या वॉर्डच्या विकासकामांसाठी मर्यादित न राहता इतर वॉर्डच्याही सदस्यांसोबत समन्वय साधून गावातील प्रश्न सोडवण्यासाठी सहभागी होणे.
- वैयक्तिक लाभार्थी योजनांसाठी आपल्या वॉर्ड मधून योग्य व गरजू लाभार्थीची निवड होईल यासाठी ग्रामसभेमार्फत प्रयत्न करणे.
- ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा, दिवाबत्ती, रस्ते स्वच्छता इत्यादी सारख्या बाबी सुरळीत चालू राहतील याची खबरदारी घेणे.
- नागरिकांच्या समस्या व गरजा समजावून घेऊन त्यांवर ग्रामसभा बैठकीत चर्चा घडवून आणणे, त्यावर उपाययोजना सुचविणे.
- ग्रामसभा ठराव मंजूर करून घेण्यात भूमिका बजाविणे इत्यादी कार्ये ग्रामपंचायत सदस्यांची आहेत.
- गावातील महत्वाचे प्रश्न आणि समस्या सोडवणुकीसाठी ग्रामसभेला मार्गदर्शन करणे.
- ग्रामपंचायतीच्या कारभारावर व नोकरांवर देखरेख करणे.
- ग्रामपंचायतीचे उत्पन्न व ग्रामनिधी यांचा उपयोग योग्य तऱ्हेने होतो की नाही यावर लक्ष ठेवणे.
ग्रामपंचायतीमधील प्रत्येक कामकाजामध्ये ग्रामपंचायत सदस्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असतो.
वाचक मित्रहो, जेव्हा ग्रामपंचायत सदस्यांना आपल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव होईल तेव्हा खऱ्या अर्थाने राज्यातील गाव-खेडी स्वयंपूर्ण होतील. त्यासाठी, सदस्यांना आपल्या कर्तव्यांची जाणीव असणं गरजेचं आहे. शासनाने देखील ग्रामपंचतीमधील बहुसंख्येने असलेल्या सदस्यांकडे लक्ष देऊन त्यांना अधिकचे अधिकार प्रदान करायला पाहिजे. योग्य प्रशिक्षण व नियोजन करून ग्रामपंचायत सदस्य गावविकासासाठी खारीचा वाटा उचलतील हे देखील तितकेच खरे!. आपलं मत खाली टिप्पणी करून अवश्य कळवा व माहिती आवडल्यास इतरांसोबत नक्कीच शेअर करा.ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेसाठी कोणाकडे अर्ज करावा?
जिल्हा अधिकारी, पण त्यासाठी आवश्यक कागदपत्र पुरावे सादर करून तक्रारी अर्ज करावा वकिलामार्फत…… मग जिल्हा अधिकारी रीतसर कार्यालयीन चौकशी करून अहवाल मागवतात आणी जर काही दोष आढळून आला तर मग अपात्र ठरतात पण त्यासाठी वेळ आणी आपला पाठपुरावा महत्त्वपूर्ण आहे. अधिक माहितीसाठी वकिलांना भेटा, नाहीतर ग्रामपंचायत अधिनियम आणी संदर्भ वाचा.
हेही वाचा 👉👉 : ग्रामपंचायत सदस्य अपात्र नियम pdf
ग्रामपंचायत सदस्याची तक्रार कोणाकडे करता येते?
ग्रामपंचायत सदस्य ची तक्रार कोणाकडे करता येते? पऺचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, तक्रार गुन्हेगारी स्वरूपाची असल्यास पोलिस विभाग.हेही वाचा 👉👉 : ग्रामपंचायत सदस्य मानधन
संबंधित प्रश्न ग्रामपंचायत सदस्याला कोणते अधिकार असतात?
ग्रामपंचायत सचीव बनण्यासाठी कुठे अर्ज करावा? ग्रामपंचायतीने खाजगी जागेवर अतिक्रमण केले असल्यास त्याचा अर्ज कसा करावा? ग्रामपंचायतीत माहितीचा अधिकारात माहिती मिळवायची असेल तर काय करावे लागेल? ग्रामपंचायतीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार कोणाला असतात? ग्रामपंचायत व सहकारी संस्था यामधील महत्वाचा दुवा कोण असतो?हेही वाचा : ग्रामपंचायत सदस्य पात्रता
Tags:
ग्रामपंचायत
