ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांच्या शासन निर्णय वाचा

ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या व त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना.

ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या

राज्यात ग्रामपंचायतीमार्फत जवाहर रोजगार योजना, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी (आरएलईजीएस), संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना इत्यादि योजना राबविल्या जात होत्या. सन २००६ पर्यंत या विकास योजना म्हणून राबविण्यात येत होत्या, व २००६ नंतर त्यांचे कायद्यात रूपांतर झाले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम, २००५ केंद्र शासनामार्फत पारित केल्यानंतर, तसेच महाराष्ट्र रोजगार हमी कायदा २००६ मध्ये सुधारणा केल्यानंतर गावांतील प्रत्येक प्रोढ व्यक्तिची नोंद करून त्याने कामाची मागणी केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत हद्दीत कामे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे.

ग्रामसभा ही कामाचे नियोजन करणारी यंत्रणा असून गावातील प्रौढ व्यक्तीकडून जॉबकार्डसाठी अर्ज स्वीकारणे व त्यांनी केलेल्या कामाच्या मागणीप्रमाणे शेल्फवरील मंजूर कामांपैकी आवश्यकतेप्रमाणे काम सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यातील तरतुदीनुसार ग्रामपंचायत हे कामाच्या नियोजनाच्या संदर्भात मूळ घटक आहे.

ग्रामपंचायत स्तरावर मग्रारोहयोचे अभिलेख व नोंदवह्या ठेवल्या जातात. या कामाची जबाबदारी ग्रामपंचायतीची म्हणजेच सरपंच व ग्रामसेवक यांची आहे. या कामात ग्रामसेवकांना मदत करण्यासाठी व संगणकीय माहिती इ. भरण्यासाठी मदतनीस म्हणून ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा बाह्यस्थ (outsourcing) पद्धतीने घेतल्या जातात. ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्ये व जबाबदा-या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात सुधारित मार्गदर्शक सुचना एकत्रितपणे देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

शासन निर्णय

ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदान्या आणि त्यांच्या नियुक्ती देण्यांत आलेले आदेश अधिक्रमीत करून ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्ये व जबाबक त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. लिंक नावावर क्लिक करून माहिती वाचा |

  • रोजगार सेवकाचे कामे काय आहे? लिंक
  • रोजगार सेवकाची माहिती जाणून घ्या? लिंक
  • रोजगार हमी योजनेचा माहिती अधिकार अर्ज? लिंक 

Post a Comment

0 Comments