Question Papers for the Year 2024: Mathematics Subject
- (1) 15 मिनिटे = ------ सेकंड.
- (2) उद्गामी अध्यापन पद्धतीचा पुरस्कार ------ यांनी केला.
- (3) कोणत्याही घडलेल्या घटनेचा त्या्याशी संबंधित विविध अंगांनी बारकाईने विचार करणे म्हणजे ------ विचार होय.
- (4) संख्यांमध्ये विशिष्ट क्रम असणे म्हणजे संख्यांचा ------ होय.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (1) संवेदिकारक अवस्था | (a) तर्काचा अभाव चिन्ह भाषेचा वापर |
| (2) क्रियापूर्व अवस्था | (b) अमूर्त संबोधाशी संबंधित तार्किक विचार |
| (3) मूर्त क्रियात्मक अवस्था | (c) माहिती आणि अनुभवाचा अभाव |
| (4) औपचारिक क्रियात्मक अवस्था | (d) वेळेत कृती करता येणे |
| (e) मूर्त वस्तूंशी संबंधित तर्काधिष्ठित विचार |
- पर्यवेक्षित अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचे स्वयंकर्तृत्व जागृत होऊन स्वयं-अध्ययनाची सवय लागते.
- विद्यार्थ्यांना वेळöवेळेळी शिक्षकाचे मार्गदर्शन मिळते.
- नियमित अभ्यास करीत असल्यामुळे आकलन क्षमता वाढते.
- चुका वेळीच दुरुस्ती होत असल्यामुळे अभ्यासातील प्रगती कळते.
- विद्यार्थ्यांच्या अडचणी व शंका व्यक्तिगतरीत्या शिक्षकाला समजून घेता येतात व त्यानुसार मार्गदर्शन करता येते.
- पर्यवेक्षित अभ्यासामुळे शिक्षक विद्यार्थी आंतरिक्रिया उत्तमप्रकारे घडून येते.
- विद्यार्थ्यांत विषयाची गोडी निर्माण होते.
- विद्यार्थ्यांना संदर्भांचा वापर करता येतो. ते कसे हाताळावयाचे याचे ज्ञान मिळते.
विद्यार्थ्यांना अध्ययनातील माहिती स्वतः शोधून काढावी लागत असल्यामुळे ज्ञान चिरकाल टिकते.
(2) व्हॅन हेल्स यांच्या भूमितीय विचारंचे कोणतेही चार स्तर स्पष्ट करा.
उत्तर : व्हॅन हेल्स यांच्या भूमितीय विचारंचे लेख खालीलप्रमाणे आहे.
(3) गणित शिक्षकाच्या दृष्टीने संरचनेचे चार उपयोग लिहा.
उत्तर : संरचनेचे फायदे खालीलप्रमाणे आहे.
- एका दृष्टिकक्षेपात त्या विषयाच्या रचनेची मांडणीची माहिती मिळते.
- विषयातील शाखा उपशाखा व त्यावरील घटक उपघटक यांची माहिती मिळते.
- आपला घटक विषयाच्या संरचनेत नेमका कोठे आहे ते कळते.
- शिक्षकाला त्या संरचनेतील आपल्या पाठ्यंशाचे स्थान कळते.
- संरचनेतील घटकांमधील परस्पर संबंध कळतात व त्यामुळे आशयाला अर्थपूर्णता प्राप्त होते.
- संरचनेमुळे थोड्या श्रमात विषयाची अधिक माहिती लक्षात ठेवणे सोपे जाते.
(4) आकारीक मूल्यमापनाची कोणतीही चार साधने सांगा.
उत्तर : आकारीक मूल्यमापनाची साधने पुढीलप्रमाणे -
प्रात्यक्षिक/प्रयोग, 2) उपक्रम/कृती, 3) प्रकल्प, 4) चाचणी, 5) स्वाध्याय/वर्गकार्य, 6) दैनंदिन निरीक्षण, 7) तोंडीकाम, 8) इतर.
प्रात्यक्षिक/प्रयोग - स्वतःचे विचार अभिव्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे प्रयोग किंवा प्रायोगिक होय. या साधनात कृतीतून संकल्पना, नियम, गुणधर्म, तत्व, सूत्र, निष्कर्ष समजून घेतले जातात.
उपक्रम/कृती - विषयाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशिष्ट हेतू ठेवून विविध कृतींची केलेली गुंफण म्हणजे उपक्रम होय.
प्रकल्प - विषयाच्या समस्येच्या व्यापक विचार करण्यासाठीचे साधन म्हणजे प्रकल्प.
चाचणी - पुस्तकाशिवाय/पुस्तкаसह अशी दोन प्रकारची घेतली जाते.
प्रश्न 3 : खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 120 ते 160 शब्दांत लिहा. 12
(1) विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयामुळे निर्माण होणारा नीटनेटकेपणा व काटेकोर-पणा पाहण्यासाठी सहा मुद्यांच्या आधारे पडताळसूची तयार करा.
उत्तर : पडताळसूची सुची पुढीलप्रमाणे -
| अ.क्र. | निरीक्षणाचे घटक | विद्यार्थ्यांची नावे | ||||
| पवन | सीमा | राजू | रत्ना | जय | ||
| 1. | विद्यार्थ्याचा गणवेश दररोज नीटनेटका असतो | ✓ | ✓ | ✓ | × | ✓ |
| 2. | विद्यार्थ्याच्या वह्या टापटीप असतात | ✓ | × | ✓ | ✓ | × |
| 3. | भौमितिक आकृत्या काटेकोरपणे काढतो | ✓ | ✓ | × | ✓ | × |
| 4. | वहीमध्ये अनुक्रमणिका लिहितो | ✓ | ✓ | ✓ | ✓ | ✓ |
| 5. | प्रत्येक दिवसाची तारीख वहीवर लिहितो | ✓ | ✓ | × | ✓ | ✓ |
| 6. | बेरीज, वजाबाकी करताना अंक अचूक एकाखाली एक लिहितो | ✓ | ✓ | ✓ | × | ✓ |
(2) खालील संख्यामालेचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
2, 4, 5, 6, 7, 13, 17
i) दिलेल्या संख्यामालेतील सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
उत्तर : वरील संख्यामालेतील सर्वात लहान मूळ संख्या '2' आहे.
ii) दिलेल्या संख्यामालेतील जोड मूळ संख्या कोणत्या?
उत्तर : वरील संख्यामालेतील जोड मूळ संख्या नाही.
iii) दिलेल्या संख्यामालेतील सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती?
उत्तर : वरील संख्यामालेतील सर्वात लहान संयुक्त संख्या '4' आहे.
(3) 'वर्तुळ' या घटकाचे आशय-विश्लेषण करा.
उत्तर : - आशय विश्लेषण नमुना -
किंवा
गणित पाठ्यपुस्तकाचे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्व लिहा.
(4) शाळेतील 150 विद्यार्थ्यांचे पालक कोणता मुख्य व्यवसाय करतात याची विद्यार्थ्यांकडून संकलित केलेली माहिती दिली आहे. त्याआधारे या माहितीचा चित्रलेख तयार करा.
| अ.क्र. | व्यवसाय | विद्यार्थी संख्या |
| 1. | शेती | 60 |
| 2. | खाजगी नौकरी | 20 |
| 3. | सरकारी नौकरी | 30 |
| 4. | इतर व्यवसाय | 40 |





0 Comments