![]() |
| राशन कार्ड माहिती. |
Ration Card info रेशन योजनेतून नाव वगळल्यास तपासा ऑनलाइन.
शिधापत्रिका रेशन कार्ड ही केवळ स्वस्त धान्य मिळवण्यासाठी नव्हे तर माणसाची ओळखपत्र म्हणून वापरले जाते.पण अनेकदा विविध कारणांमुळे शिधापत्रिकेवर नाव वगळले जाते ही बाब आयत्या वेळी लक्षात आल्यास सर्वसामान्यांना अडचणीचा सामना करावा लागतो ही समस्या लक्षात घेऊन रेशन कार्ड ची सद्यस्थिती ऑनलाईन तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अन्नसुरक्षेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने ठराविक उत्पन्न मर्यादित राखून दिली आहे.
Ration Card info रेशन योजनेतून नाव वगळल्यास बरेच जण दरात धान्य मिळवण्यासाठी त्या नियमांचा भंग करतात ही बाब निदर्शनास आल्यानंतर शासनाकडून रेशनकार्ड रद्द करण्याची कारवाई केली जाते त्याशिवाय आणि बाबींची पूर्तता न केल्याने ही रेशन योजनेतून नाव वगळले जाते महत्त्वाच्या कामात दरम्यान त्यावेळी हा प्रकार लक्षात आल्यास त्यांना अडचणींना सामना करावा लागतो त्यामुळे आपले नाव रेशन योजनेत समाविष्ट आहे की नाही हे घरबसल्या ऑनलाइन यंत्रणा द्वारे तपासून पाहू शकता.
Ration Card Update रेशन योजनेतून नाव वगळल्यास आपले नाव बघण्यासाठी. दिलेल्या लिंक वर क्लिक करून संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल तिथे तुम्हाला रेशन कार्ड या पर्यायावर गेल्यानंतर रेशन कार्ड डिटेल आणि स्टेट पोर्टल हा ऑप्शन दिसेल तेथे राज्य आणि जिल्हा निवडा त्यानंतर विभागीय शिधापत्रिका कार्यालयाचे नाव निवडावे लागेल ते रेशन कार्ड चा प्रकार उदाहरण.
केसरी बीपीएल नमूद केल्यानंतर शिधापत्रिका धारकांची यादी दिसली या यादीत नाव समाविष्ट नसल्यास त्रेशन योजनेतून नाव व घडल्याचे स्पष्ट होईल.
रेशन विभागाला फोन करून तक्रार दाखल करा.फुकट फोन आहे,पैसे लागत नाही, हिंमत लागते.
हे होत नाही ते होत नाही बोलण्यापेक्षा एक तक्रार करा.
🔴 रेशन संबंधी कोणतीही तक्रार असल्यास ती खाली नमूद केलेल्या ठिकाणी करा.
१. वेबसाइट : http://mahafood.gov.in/pggrams/
२. E-Mail :- helpline.mhpds@gov.in
३. हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक :-
१८०० २२ ४९५०
४. रेशन कार्यालयात (तहसीलदार कार्यालय) उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात.
५. प्रत्येक रेशन दुकानात उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तकात. तक्रार करू शकता.
रेशन आमच्या हक्काचं।
#रमेशकदम
क्लिक करून बघा वेबसाईट click here.
