![]() |
| शेतकऱ्यांची लुट तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तोंडी |
शेवगांव शहरात आणि तालुक्यात काही कृषी सेवा केंद्रांवर कबड्डी कंपनीचे कपाशीचे बनावट बियाणे???
शेतकऱ्यांची लुट तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तोंडी आणि लेखी तक्रारी शेतकऱ्यांकडून कारवाईची प्रतीक्षा!!
अविनाश देशमुख शेवगाव
खरीप हंगाम जवळ आल्यावर शेतकऱ्यांची लगबग सुरु होतें बी- बियाणे खते खरेदी करण्याकडे असतो घरातील महिलांचे दागदागिने गहाण ठेऊन सावकाराकडून कर्ज काढुन पोटाला चिमटे घेऊन कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन खरेदी करतॊ* पण यंदा पावसाचा पत्ता नाही पण बनावट बियांनांचा मुसळधार पाऊस तालुक्यात आणि शहरात सर्वसामान्य शेतकऱ्यांना लुटण्यासाठी टपलेले डोमकावळे यांना चाप कोण लावणार??
शेवगांव शहरातील आणि तालुक्यातील कृषिसेवा केंद्रांमध्ये अहमदनगर च्या उत्तर जिल्ह्यातुन संगमनेर श्रीरामपुर राहुरी आदी तालुक्यातुन शेतकरी बी बियाणे नेण्यासाठी येत असतात त्यांना सुद्धा काही महाभाग मराठवाड्यातील जालना आणि विदर्भातील अमरावती येथुन आलेले बनावट बियाणे माथी मारून बोळवण करतात* हे रॅकेट कोण चालवते ???
याला कोणाचा आशिर्वाद आहे ???
याची सखोल चौकशी होऊन *संबंधितांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे हे बागड बिल्ले कोण???
