![]() |
| Acb चा जाळ्यात. |
चार हजाराची लाच घेतांना आष्टीत ग्रामसेवक जेरबंद.
बीड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांची बिल काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणी करून चार हजार रुपये स्वीकारताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाईआष्टी येथील पंचायत समिती आवारात 13 जून रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आली.
किरण दगडू वनवे असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे ते धनगरवाडी तालुका आष्टी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत होते गावातील 48 वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या शेततळ्याचे मजुरांचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवक किरण वनवे याने पाच हजार रुपयाची लाचेची मागणी केली याबाबत पंचायत समक्ष पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचण्यासारखे आहे. -- >> ग्रामपंचायत चा निधी चा माहिती अधिकारात माहिती कशी मांगावी.
तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले होते आष्टी येथील पंचायत समिती समोर तक्रारदार कडून चार हजार रुपये स्वीकारताना याची पथकाने झडप घालून किरण वनवे ला पकडले.
आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी प्रक्रिया सुरू होती उपअधीक्षक शंकर शिंदे पोलीस अमलदार अमोल खरसाडे अविनाश गवळी चालक गणेश मेहेत्रे यांनी कारवाई केली
