Helth Update उपवास करताना घ्या काळजी हेल्थ अपडेट.

उपवास करताना घ्या काळजी हेल्थ अपडेट
Helth tip's Update 

उपवास करताना घ्या काळजी हेल्थ अपडेट

 वटपौर्णिमा सणानिमित्त महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी महिला उपवास करतात. उपवास हा आराेग्यसाठी फायद्याचा ठरत असताे. परंतु उपवासात याेग्य वेळी आहार, पाणी न घेतल्यास आराेग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आराेग्याची काळजी घेऊन उपवास करता येईल, अशा काही खास टिप्स्...

फळांचे सेवन करा*

तज्ज्ञांच्या मते उपवासादरम्यान फळे जास्त प्रमाणात खावीत. ही फळे रसदार असावीत. निरोगी पद्धतीने उपवास सोडण्यासाठी सॅलड आणि फ्रूट महत्वाचे आहे.

सुकामेवा फायदेशीर

खजूर हा पौष्टिक घटकांचा एक केंद्रित स्त्रोत आहे. त्याचे सेवक अधिक फायद्याचे ठरते. 

कॉफी पिणं टाळा

कॅफिनचे सेवन आरोग्यासाठी घातक असते. उपवास सोडल्यानंतर देखील चहा किंवा कॉफी न पिल्यास फायद्याचे ठरते.  

ऊर्जेसाठी हे करा

उपवासानंतर लगेचच प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने उपवासात गमावलेली ऊर्जा परत मिळते. त्यामुळे आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. 

भरपूर पाणी प्या

दिवसभर पाणी न पिल्याने होणाऱ्या निर्जलीकरणामुळे काही महिलांना मळमळ, अशक्तपणा, चक्कर येऊ शकते. यामुळे उपवासात शरीरात पाण्याची कमकरता हाेऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक ठरते. 

तेलगट टाळा

उपवास साेडताना एकदम भरपूर जेवण करू नका. पचायला हलके अन्नपदार्थ घ्या. अॅसिडिटीची समस्या टाळण्यासाठी तेलकट आणि मसालेदार अन्न टाळा. 

Post a Comment

Previous Post Next Post