E gram Swaraj App ची संपूर्ण माहिती जाणून घ्या मराठीत

E gram swaraj App : नमस्कार मंडळी आज आपण ग्रामपंचायतला जमा झालेला ग्रामनिधी व शासनाकडून आलेला निधी व त्या निधीतून झालेली कामे ही सोप्या पद्धतीने कशी क्रॉस चेक करता येइल याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर E-gram swaraj app Information In Marathi बद्दल माहिती जाणून घेऊया.

E gram Swaraj App ची संपूर्ण माहिती जाणून घ्या मराठीत
E-gram swaraj app.

ग्राम स्वराज पोर्टल काय आहे?

प्रत्येक ग्रामपंचायतला दरवर्षी वित्त आयोगाच्या निधीसाठी शासनाला कृती आराखडा तयार करून पाठवायचा असतो, कृती आराखडा म्हणजे येणाऱ्या आर्थिक वर्षात त्या गावात कोणकोणती कामे करावयाची आहे व त्या कामासाठी अंदाजे किती निधी लागणार आहे.

E gram Swaraj App ग्रामपंचायत Found

हा कृती आराखडा व ग्रामपंचायतचे सर्व जमा खर्चाचे Voucher ची entry ग्रामसेवक Computer operator च्या साहाय्याने Online शासनाच्या E-gram swaraj या portal वर upload करत असतो.

मला माझा पंचायत निधी कसा कळेल?

E-gram swaraj app या मध्ये आपल्याला सामान्य फंड, वित्त आयोगाचा निधी तसेच ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात येणाऱ्या इतर योजनांची माहिती सहज प्राप्त होइल. सामान्य फंडात जमा झालेला निधी व त्यामध्ये दाखविण्यात येणारा खर्च हा खरोखरच आपल्या गावात होत आहे काय ?

E-gram swaraj मध्ये कसे चेक करावे ?

Total works म्हणजे कृती आराखडा जो ग्रामपंचायत शासनाला सादर करते गावातील विकासकामे करण्यासाठी. त्या app मधे हेच चेक करायचे आहे कि कृती आराखडयानुसार जर निधी मंजूर झालेला आहे तर ती सर्व कामे गावात झालेली आहे कि नाही.

Fund allocated to G.P. म्हणजे त्या कृती आराखड्यासाठी मंजूर झालेला निधी.

आता निधी आला कि नाही ते आपल्याला Finanacial progress मधे Receipt मधे पाहता येइल व तो निधी खर्च झाला कि नाही व कोणत्या कामावर खर्च झाला ते Exependiture मधे पाहता येइल.

  • १) निधी आला व खर्च पण दाखवित आहे तर ते काम तेवढ्या निधीचे झालेले आहे किंवा नाही ते बघायचे असते.
  • २) निधी आला खर्च दाखविण्यात आला परंतु गावात काम दिसत नाही तर त्याची तक्रार करून चौकशी व्हायला पाहिजे.
  • ३) निधी आला व काम झाले नाही व खर्च ही झाले नाही तर असे का झाले याचे उत्तर सुद्धा ग्रामपंचायतला विचारायला पाहिजे.

शक्यता......

कृती आराखड्यात दाखविण्यात आलेले काम नाही झाले, काम झाले परंतु दाखविण्यात आलेल्या खर्चानूसार कामाची गुणवत्ता नाही किंवा कामासाठी दाखविण्यात आलेल्या खर्चाच्या हिशोबाने काम खुपच कमी दिसत असेल.

उदाहरणार्थ.... 

  • १) गावातील सिमेंट रस्ते
  • २) नाली बांधकाम
  • ३) RO Plant
  • ४) शाळेचे अंगणवाडीचे सौंदर्यीकरन
  • ५) अंगणवाडीला दरवर्षी पुरविण्यात येणारे साहित्य, फर्निचर, खेळणी, साउंड सिस्टीम
  • ६) नालीसफाई साठी ग्रामसेवक अवाढव्य रकमा दाखवितो
  • ७) पाण्याच्या टाकी सफाईसाठी (Iron bleaching)
  • ८) समाज मंदिराचे बांधकाम 
  • ९) स्मशानभूमीच्या कामासाठी येणारा निधी

असे अजून बरेचसे खर्च दाखविण्यात येतात.

  • कोणत्याही कामात जर तुम्हाला अनियमितता दिसत असेल तर तुम्ही (उदाहरणार्थ २०१५ ते २०२०) या आर्थिक वर्षाची चौकशीची मागणी करु शकता.
  • तुम्ही गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे चौकशी साठी तक्रार अर्ज करु शकता.
  • तक्रार अर्जाची झेरॉक्स काढून त्यावर नेहमी रिसिव्हींग घेणे आवश्यक आहे. (पोच पावती/त्या कार्यालयाचा सही व शिक्का).
  • गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना तक्रार अर्ज दिल्यानंतर कारवाई होत नसेल तर परत एका महिन्यानंतर स्मरण पत्र द्या.
  • त्यानंतर ही जर गटविकास अधिकारी कारवाई करत नसेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कडे तक्रार अर्ज करावा, अर्जासोबत गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रार अर्जाची व स्मरण पत्राची प्रत जोडावी.
  • शासकीय कार्यालयात आपण दिलेल्या तक्रार अर्जाची / निवेदनाची १५ ते ३० दिवसात दखल न घेतल्यास शासकीय कार्यालयाला आपल्या तक्रार अर्जाचे / निवेदनाचे स्मरण (आठवण) करून देण्यासाठी पुन्हा एक पत्र द्यायचे त्यालाच स्मरण पत्र असे म्हणतात.

झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अवश्य होइल, फक्त पाठपुरावा सतत करत रहावा लागेल.

Terms and conditions. About Ua Page. Link. 

E-gram swaraj  Link

धन्यवाद.........🙏

ग्रामपंचायत कारभाराविषयी व योजनांबाबत जनसामान्यांची जनजागृती करणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.

श्री इमरान पठाण (संस्थापक अध्यक्ष)

युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य. मो.नं. ९९६७३४३३४०.

अशाच नवनवीन माहिती जाणून घ्यायचे असल्यास आमचा चॅनेल चा ग्रुप ला नक्कीच जॉईन व्हा..

Telegram Channel Link. |   

Facebook Channel Link. | 

Post a Comment

Previous Post Next Post