प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत असणारे आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, कोडीद येथे दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम(RKSK) अंतर्गत कार्यक्षेत्रातील मुले - मुली ह्यांना त्यांच्या स्वास्थ्यातील उपदेशासाठी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK) अंतर्गत मासिक सभा आयोजित करण्यात आली.
![]() |
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, कोडीद येथे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम(RKSK) संपन्न.!
ह्या कार्यक्रमात आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कार्यक्षेत्रातील किशोरी मुले-मुली ह्यांना त्यांच्या स्वास्थ्याबद्दल सखोल मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. बाल्यावस्थेमधुन तारुण्यावस्थेत होणारे शारीरिक व मानसिक बदल ह्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
ह्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप वळवी, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीदचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी मुले - मुली व आशा सेविका ह्यांना मार्गदर्शक व समुपदेशन केले उपस्थित आरोग्य सेवक ए.पी. नेटके, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, गटप्रवर्तक ज्योती पावरा व आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे आशा सेविका उपस्थित होते.
*- आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, कोडीद*
