विहिरीसाठी मागितली लाच; सरपंचाने उधळले पैसाच पैसा. | Gramin Batmya

विहिरीसाठी मागितली लाच; सरपंचाने उधळले २ लाख फुलंब्री : ग्रामविकासमंत्र्यांनी बीडीओंना निलंबित करून दिले चौकशीचे आदेश.

ग्रामीण बातम्या  : फुलंब्री शासकीय योजनेतील विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी १२ टक्के लाचेची मागणी केल्याच्या कारणावरून तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने शुक्रवारी दुपारी बारा वाजता येथील पंचायत समिती कार्यालयासमोर दोन लाख रुपयांची उधळण केली. तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने संताप व्यक्त करीत अनोखे आंदोलन केले. या घटनेची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांना निलंबित करून तक्रारदाराच्याही चौकशीचे आदेश दिले आहेत.

फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर गळ्यात शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल अडकवून आले. यावेळी त्यांनी पंचायत समितीमध्ये माझ्या गावात विहिरीचे २० प्रस्ताव दाखल आहेत.

फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर पैसे उधळताना 


या कामाला मंजुरी देण्यासाठी गटविकास अधिकारी १२ टक्के रक्कम मागत आहेत. बुधवारी मी पंचायत समिती कार्यालयात येऊन कनिष्ठ अभियंता गायकवाड, गावातील ग्रामरोजगार सेविका यांच्यासोबत गटविकास ('संमिश्र वर)

सरपंच मंगेश साबळे, यांचे आरोप बिनबुडाचे

सरपंच मंगेश साबळे यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. वास्तविकत: गेवराई पायगा येथे अगोदरच विहिरी मंजूर आहेत, तसेच दोन दिवसांपूर्वीच त्यांनी काही प्रस्ताव दाखल केले आहेत. ते प्रस्ताव मंजूर करण्याकरिता त्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मी अबू नुकसानीचा दावाही दाखल करणार आहे. - ज्योती कवडदेवी, गटविकास अधिकारी.


Post a Comment

Previous Post Next Post