10वी 12वी बोर्डाच्या परीक्षार्थींसाठी खुशखबर 10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावी बारावी परीक्षेचे पेपर तपासणीचे काम जवळ जवळ पूर्ण झाले असेल . 10वीच्या आणि 12वी परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
ग्रामीण न्यूज - : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे पेपर तपासणी जवळपास संपली आहे. आता 10वीच्या आणि 12वी परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. यंदा, बोर्ड 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 10 जूनपर्यंत जाहीर करेल आणि 10वी बोर्डाचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर होईल,' असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले.
दरवर्षी 12वी आणि 10वीच्या परीक्षांचे निकाल मे महिन्यात, जून महिन्यात जाहीर होतात. मात्र शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याने निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत. 12वी आणि 10वीच्या परीक्षांचे निकाल जून महिन्यातच जाहीर होणार असल्याने आता विद्यार्थी आणि पालकांची मोठी चिंता मिटली आहे.
नियमानुसार शेवटच्या पेपरनंतर दोन महिन्यांनी ६० दिवसांनी निकाल जाहीर होतो. मात्र यंदा बारावीचा पेपर १५ दिवस उशिरा सुरू झाला असून १० जूनपर्यंत निकाल जाहीर होईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
यावर्षी 10वीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू झाल्या आणि 4 एप्रिल 2022 रोजी संपल्या. कोरोनामुळे 12वी आणि 10वीच्या या परीक्षा दोन वर्षे होऊ शकल्या नाहीत. मात्र यावेळी परिस्थिती नियंत्रणात असल्याने राज्यात दोन शिफ्टमध्ये परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्या. राज्यात एकूण 16 लाख 49 हजार 172 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 8 लाख 89 हजार 584 पुरुष व 7 लाख 51 हजार 487 महिला विद्यार्थिनींनी परीक्षा दिली.
आता 12वी बोर्डाचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 05-09 जून रोजी जाहीर होणार असे म्हटले आहे.
आता 10वीचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 10-15 जूनला जाहीर होणार असे म्हटले आहे.
Tags:
News
