अनुसूचित जमातीचे आरक्षण धनगर समाजाला दिल्यास रस्त्यावर उतरू जय आदिवासी युवाशक्ती सरकार ला इशारा.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू जय आदिवासी युवाशक्ती संघटना सुरगाणा यांचा सरकारला इशारा.



बोरगाव - धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नका, तसे झाले तर आदिवासी बांधवांवर अन्याय होईल, अशी भूमिका जय आदिवासी संघटना सुरगाणा तालुका यांनी निवेदनाद्वारे केली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा

निवेदनाद्वारे सत्ताधाऱ्यांना दिला आहे. धनगर हे आदिवासी नाहीत हे अनेक कसोट्यांवर सिद्ध झाले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने

धनगर आदिवासी नसल्याचा अहवाल दिला आहे.

 सत्ताधारी पक्ष आदिवासींच्या आरक्षणात नवा वाटेकरी तयार करत असल्याचा आरोप सुरगाणा तालुका जय आदिवासी युवा शक्ती संघटना अध्यक्ष लक्ष्मण भोये यांनी केला आहे.

यावेळी जय आदिवासी संघटनेचे मोतीराम भोये सतीश गाढवे खुशाल शिंदे उत्तम गांगुर्डे रघुनाथ भोये भूषण भोये काळू चौधरी लक्ष्मण बोरसे माजी सरपंच संघटनेचे सर्व पदाधिकारी व आदिवासी नागरिक उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post