वनदावे मंजूरीसाठी बिरसा फायटर्स चे ठिय्या आंदोलन.

वनदावे मंजूरीसाठी बिरसा फायटर्सचे ठिय्या आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित.

वनदावे मंजूरीसाठी बिरसा फायटर्सचे ठिय्या आंदोलन
बिरसा फायटर 

दिनांक:२० डिसेंबर २०२३ शहादा

शहादा:जिल्ह्यासह शहादा तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले वनदावे तात्काळ मंजूर करून निकाली काढावीत;यासाठी बिरसा फायटर्ससह प्रलंबित वनदावेदारांनी शहादा विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

काही गावनिहाय प्रलंबित वनदावे वडगांव ३४४,चांदसैली १३१, दूधखेडा ५८, लंगडी १७९,सटीपाणी ३००,मानमोळ्या ७७, नवानगर ४०,भोंगरा २५ व मलगाव येथील संबंधित कार्यालयाकडून हरवलेले १४९ असे एकूण १३०३ प्रलंबित वनदावे मंजूर करून तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली.

हेही वाचा | शासकीय योजना ची माहिती 

अधिकारी आंदोलन स्थळी येऊन आपल्या मागणीनुसार विभागीय वन हक्क समितीची बैठक घेऊन लवकरच वनदावे निकाली काढू;व बैठकीवेळी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात येईल असे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा -. पेसाच्या रिक्त जागा रोष्टर बिंदुनुसार पवित्र पोर्टलवर उपलब्ध करा - बिरसा फायटर्स.

संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा व गोपाल भंडारी,सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित वनदावेदारांना मार्गदर्शन केले.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धप्रमुख जालिंदर पावरा,वडगांव शाखाध्यक्ष राहुल चव्हाण,कार्याध्यक्ष बिरबल पावरा,माजी सरपंच रमेश पावरा,राजेश वळवी,करण सुळे,सुनील ठाकरे,राजल ठाकरे व मोठ्या संख्येने प्रलंबित वनदावेदार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post