कापसाला प्रति क्विंटल 15,000 हजार रुपये हमीभाव द्या : बिरसा फायटर्स.

कापसाला प्रति क्विंटल 15,000 हजार रुपये हमीभाव द्या : बिरसा फायटर्स.
कापसाला प्रति क्विंटल 15,000 हजार रुपये हमीभाव द्या : बिरसा फायटर्स.

शिरपूर प्रतिनिधी: कापसाला प्रति क्विंटल 15,000 हजार रुपये हमीभाव देऊन खरेदी करण्यात यावे अशी मागणी बिरसा फायटर्स शिरपूर संघटनेने पंतप्रधान, कृषिमंत्री, सचिव कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री, कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तहसीलदार, शिरपूर यांच्यामार्फत निवेदन व कापूस देऊन मागणी करण्यात आली.

निदेनात म्हटले आहे कि, दरवर्षी जिल्ह्यात कापूस या नगदी पिकांचे लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पीक चांगले येऊन आर्थिक लाभ मिळावे, या आशेने शेतकरी कापसाची लागवड करतो. परंतु, सरकार योग्य हमीभाव देत नाही. व्यापारी अल्प दराने शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करतांना दिसून येत आहे. गरीब शेतकरी कर्ज काढून, उसनवारीने पैसे घेऊन बी-बियाणे, औषधे, खते, मजूरी, लागवड खर्च व दिवसरात्र काबाडकष्ट करून जेमतेम पीक पिकवतो. आणि जेमतेम पिकवलेल्या पिकांला कवडीमोलाने खरेदी केली जाते. त्यामुळे केलेला खर्चही निघणे मुश्किल होत आहे.

हेही वाचा - गावातच मिळेल काम 

अनेक शेतकऱ्यांनी 3 ते 4 महिन्यांपासून घरात साठवलेला कापूस विकून टाकला आहे. तर अद्याप काही शेतकरी कापसाचे दर पुन्हा वाढतील या अपेक्षेनं कापूस घरातच ठेवून आहेत. परंतु, आजही भाव जैसे थे असल्याने शेतकरी चिंतेत आहे. अगोदरच, अनियमित पाऊस व अस्मानी संकटाने पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होतात. मात्र, नुकसान भरपाई मिळत नाही. यावर्षी उत्पादन जेमतेम आहे व शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने देशाचा पोशिंदा वाढती महागाईमुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांनी जगायचे कसे? केंद्र व राज्य शासनाने कापसाला पाहिजे तेवढा भाव न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. यंदा कमी पावसामुळे कापसाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.

कापसाला प्रति क्विंटल 15,000 हजार रुपये हमीभाव द्या : बिरसा फायटर्स.
कापसाला प्रति क्विंटल 15,000 हजार रुपये हमीभाव द्या : बिरसा फायटर्स.

केंद्र व राज्य सरकारद्वारा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, पिकांना हमीभाव देवू या वचनाचा विचार करून देशाचा पोशिंदा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कापूस पिकाला प्रति क्विंटल 15,000 हजार रुपये हमीभाव देऊन खरेदी करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देतांना यांची उपस्थिती

विलास पावरा अध्यक्ष नाशिक विभाग, ज्ञानेश्वर मोरे गाव शाखा अध्यक्ष, ईश्वर मोरे तालुकाध्यक्ष, गेंद्या पावरा सचिव, भोंग्या पावरा, शिवाजी पावरा, कैलास पावरा, संग्राम पावरा, शांतिलाल पावरा, जितु पावरा, विकास पावरा आदि उपस्थित होते.

“प्रति एकर कमी उत्पादकता आणि उत्पादनाला चांगला भाव मिळालेला नाही; तर एकीकडे बी-बियाणे, औषधे, खते, मजूरी, लागवड खर्च व इतर जीवनावश्यक वस्तूंची किमती गगनाला भिडले आहे. अशा परिस्थितीत कापसाला प्रति क्विंटल 15,000 हजार रुपये योग्य बाजारभाव मिळणे अत्यावश्यक आहे, अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होतील.”

विलास पावरा, अध्यक्ष, नाशिक विभाग

Post a Comment

Previous Post Next Post