डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर| dr. b.r. ambedkar.

Dr.B.R. Ambedkar
Dr.B.R. Ambedkar

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.

 If democracy dies it will be or doom लोकशाही संपली की सामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल लोकशाहीचा मृत्यू म्हणजे सामान्य लोकांचा मृत्यू.

न्याय=  सामाजिक आर्थिक व राजनैतिक नागरिकात जात धर्म व लिंक यावरून भेदभाव नाही. 

स्वातंत्र्य= विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचे.

समता दर्जा व संधी या बाबतील कायद्यासमोर सर्व नागरिकांना समान असतात.

 बंधुता व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता राखणारी.

 सार्वभौम भारत हा कोणत्याही देशावर अवलंबून नाही किंवा इतर देशाला वसाहत नाही तर एक स्वतंत्र राष्ट्र आहे असे सार्वभौम या शब्दातून सूचित होते सार्वभौम राष्ट्र असल्याने भारत दुसऱ्या देशाचे क्षेत्र अधिरोहित करू शकतो किंवा आपले क्षेत्र दुसऱ्या देशाला देऊ शकतो भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य मुळे ही भारताच्या सार्वभौमत्व तत्त्वावर कोणत्याही मर्यादा येत नाही.

समाजवादी लोकशाही

समाजवादी प्रणालीमध्ये मिश्र अर्थव्यवस्था असते आणि सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचेसह अस्तित्व असते सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे लोकशाही समाजवादी प्रणाली दारिद्र्य अज्ञान अनारोग्य आणि संधी तील असमानता दूर करते विशेष म्हणजे भारताचे समाजवादी प्रणाली ही सर्व उत्पादन साधनांचे व वितरण व्यवस्थेचे राष्ट्रीय करण करणारी व खाजगी मालमत्ता रद्द करणारी साम्यवादी समाजवादी प्रणाली किंवा राष्ट्रीय समाजवादी प्रणाली नसून लोकशाही समाजवादी प्रणाली आहे.

 प्रजासत्ताक.

 प्रजासत्ताक या संज्ञेत सर्व अधिकार जनतेकडे आहे त्यामुळे सर्व सर्वजणी पदे कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी खुली आहे प्रजासत्ताक पद्धतींमध्ये राष्ट्रप्रमुख आणि नेहमी पाच वर्षांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो.

 न्याय

  न्याय या सज्ञत तीन प्रकार आहेत.आर्थिक सामाजिक व राजकीय सामाजिक न्याय म्हणजे जात,वर्ण,वंश, धर्म, लिंग इत्यादी घटकांवर आधारित कोणताही सामाजिक भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान वागणूक दिली जाणे आर्थिक न्याय म्हणजे आर्थिक घटकांच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करणे होय यामध्ये संपत्ती उत्पन्न व मालमत्ता यांच्यात ठळकपणे दिसून येणारी विषमता दूर करणे अंतर्भूत आहे राजकीय न्याय आणि सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार सर्व राजकीय पदांसाठी समान संधी आणि सरकारमध्ये आपले मत व्यक्त करण्याची समान संधी आहे.

स्वातंत्र्याचा हक्क

स्वातंत्र्याचा हक्क( Right to Freedom )हा लोकशाही जीवनपद्धतीचा आत्मा आहे मानवी जीवनाचे एक प्रधान मूल्य आहे व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकासासाठी आणि त्यायोगे समाज कल्याण साधण्यासाठी स्वातंत्र्याचे आवश्यकता असते घटनेचा 19व्या कलमांमध्ये नागरी स्वातंत्र्य असलेल्या सर्व महत्त्वाचा हक्कांचा उल्लेख आहे.

Post a Comment

Previous Post Next Post