खरंच सुंदर उपक्रम एका चिमुरडी मुलीने केले आहे,, आपल्या मोठ्यांना नाही सुचलं ते ह्या चिमुरडीनं केलं.. म्हणतात ना नवीन पिढी एक पाऊल पुढे असते,,, ती अशी.. यातून समीक्षा ची समाज सेवाच नाही तर तिच्या वर आईबाबांनी केलेले संस्कार झळकतात...
निसर्गावरचं प्रेम दिसतं,,
जो निसर्गावर प्रेम करायला शिकला तो आयुष्यात कधीच मागे पडत नाही... पुढे आणि फक्त पुढेच जातो..तुला खाऊ साठी मिळालेल्या पैश्यांचा तू एवढा छान उपयोग केलास त्यासाठी तुझं खूप कौतुक.. बाकी मुलांनी तुझा नक्कीच आदर्श घ्यायला हवा,,छान समीक्षा. तु प्रयत्न आणि उपक्रम असेच चालू राहूदे,, अशा खुप शुभेच्छा तिला यामिनी पाटील यांनी दिल्या आहेत.
मी समीक्षा हिम्मत पवार इयत्ता सातवीत शिकणारी विद्यार्थीनी .
ग्रामपरिषद बोराडी
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत बोराडीच्या वतिने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची यशोगाथा.
ग्राम पंचायत बोराडीच्या वतिने माझी वंसुधरा अंतर्गत राबविण्यात येणारे अभियानाचे उपक्रम मी पाहीले. आमच्या गावातील शाळा, महाविद्यालय व गावातील प्रत्येक माणूस या आभियानात जोडला गेला आहे.
माझ्या ही मनात विचार आला की, आपण ही काहीतरी आपल्या गावासाठी, निसर्गासाठी काहीतरी करावं. पण आपण करू शकतो या वर खूप विचार करून माझ्या मनात एक विचार आला की, आपण ही आपल्या गावाच्या परिसरात पाच रोपं लावावी.
पण रोपं घेण्यासाठी पैशे आई पप्पाकडून घ्यायचे नाहीत मला खाऊसाठी आई सुट्टे पैशे द्यायची .मी ते पैशे एका गल्ल्यात जमा करत होती.असे माझ्या कडे पाचशे रूपये जमले होते . मी त्या पैश्यांनी रोप आणून आमच्या परिसरात गल्लीतल्या ज्येष्ठ मावशी, आजी , काकू यांच्या हस्ते लावून घेतले. एवढेच नाही तर मी त्या रोपांना कुपंण ही केले.व रोज नियमित एक बादली पाणी घालते. मी माझी वसुंधरा या अभियानात सामील होऊन मला फार समाधान वाटतेय समीक्षा पवार.
छान,प्रत्येक गावात असे उपक्रम घेतल्यास वसुंधरेचे रक्षण होऊन मानव जातीला त्यातून नक्कीच फायदा होईल.तुमच्या भावी उपक्रमांना शुभेच्छा ! चंद्रशेखर यांनी दिल्या शुभेच्छा
निसर्ग आणि मानव
निसर्ग अर्थ
निसर्ग चारोळी
निसर्ग कविता
निसर्ग विरोधी धोरण
निसर्ग राजा
निसर्ग आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
निसर्ग तूफान का नामकरण
