शेवगांव शहरातील भारदे गल्ली परिसरात गटारीचे पाणी रस्त्यावर कचऱ्याचे उकांडे बाळासाहेब भारदे चौकात घाणीचे साम्राज्य.
![]() |
| Simply the Best Who wrote Simply the Best The best live |
{ अविनाश देशमुख शेवगांव }
*शेवगांव शहरातील अनेक भागात नगरपरिषद च्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे भारदे गल्ली मधील श्रेणिक भंडारी पप्पूनाना भारदे आणि अंबादास देशपान्डे यांचा वाडा या परिसरात गटारीचे पाणी साचलेला उकंडा आणि उघडे चेंबर यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्या धोक्यात आले आहे.
हा परिसरात जुना वॉर्ड नंबर सात आणि सहा च्या सीमा रेषेला खेटून असल्याने कायम दुर्लक्षित राहिला आहे नगरपरिषदेच्या लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या अंडर ग्राउंड गटारी चे मेंटेनन्स कोणाकडे आहे.
नगरपरिषदेकडे अधिकारी आणि कर्मचारी यांचेकडे तक्रारी केल्यास थातुर मातुर उत्तरे दिली जातात संबंधीत कामाचे ठेकेदार बिल घेऊन मोकळे झाले आता देखभाल दुरुस्ती कोणाकडे हा संशोधनाचा विषय आहे.
या भागातील नागरिकांना साथीचा रोगाचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे *या भागात नळाच्या पाण्यात पाहिले दहा मिनटे गटारीचे मिक्स पाणी येते याच्याही वारंवार तक्रारी केल्या काही परिणाम झाला नाही या भागात पिण्याचे पाणी सुटल्यावर तर आपण एखादी होडी घेऊन नौका विहार केला तरी चालेल अशी या भागातील रहिवाश्याची मनस्थिती झाली आहे*
*ताजा कलम*
*ज्या स्व. बाळासाहेब भारदे यांनी संपुर्ण महाराष्ट्राला आधुनिक वैचारिक आणि सांप्रदायिक संत अशी ख्याती मिळवुन दिली त्यांच्या वास्त्यवणे पावन झालेल्या परिसरात अस्वचता पसरवण्याचे पाप नेमकं कोण करतंय ???
*{ क्रमशः }*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

hello sir. Mene do yadi me farm nahi bhara he Kya karu?
ReplyDelete